कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात; दोन वर्षे निधीही नाही
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक बळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व खासदाराच्या पगारात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या एक वर्षासाठी ही पगार कपात राहणार आहे. तर, दोन वर्षे खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत. कोरोना संकटाशी लढण्यासाठी याअगोदरच पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 15 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सोबतच पीएम केअर फंडाची स्थापनही करण्यात आली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येने चार हजारचा टप्पा ओलंडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. मात्र, तरीही आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. परिणामी देशात सध्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. यात रुग्णालये उभारणे, वैद्यकीय साहित्य आयात करणे किंवा त्याची निर्मिती करणे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या एक वर्षासाठी ही पगार कपात राहणार आहे. तर, दोन वर्षे खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत. खासदारांचा एकूण पगार एक लाख 90 हजार रुपये आहे. त्यातले एक लाख रुपये वेतन, 70 हजार रुपये मतदार संघ भत्ता आणि 20 हजार रुपये ऑफिस भत्ता. यातले साधारण 63 हजार रुपये कट होणार आहे. तर, खासदार निधी वर्षाला पाच कोटी रुपये मिळतो. दोन वर्षाचे दहा कोटी होतात.
Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव
'कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर फंड कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर्स फंडाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोशच्या माध्यमातून लोकांकडून मदत मागितली जायची. कोरोना संकटाशी लढण्यासाठी अनेक दानशूर लोकांनी मदत केली आहे. यात टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांनी मिळून तब्बल 1500 कोटी रुपयांची मदत केली. महिंद्रा, बजाज यांच्यासह अनेक उद्योगपतींनी मोकळ्या हाताने मदत केली. तर, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनीही मोठी आर्थिक मदत केली आहे.
मुंबईतील 'कोरोना'चे हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री'ही गंभीर स्थितीतील विभागात
देशात कोरोनाचा आकडा वाढला देशात लॉकडाऊन नंतरही कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतच आहे. आत्ताच्या घडली देशात 4067 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 291 रुग्ण देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर, 109 लोकांचा यात बळी गेला आहे. यात सर्वाधित महाराष्ट्रात 785 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल आता दिल्लीचा नंबर लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्ररशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी वारंवार सांगितले जात आहे.
Lockdown | संचारबंदीचं उल्लंघन केल्याने भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल