एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown Impact : Auto इंडस्ट्रीला दर दिवशी कोट्यवधींचा फटका
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे परिणाम अनेक क्षेत्रांवर झाले. अगदी Auto क्षेत्रही यातून वेगळं राहिलं नाही. या क्षेत्राला दर दिवशी झालेल्या नुकसानाचा आक़डा पाहून तुम्हालाही धक्काच बसेल...
नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या Coronavirus कोरोना व्हायरसमुळं अनेकांचीच आर्थिक गणितं बिघडली. या विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भारतातही देशव्यापी टाळेबंदी करण्यात आली. काही महिन्यांसाठी लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या टाळेबंदीचे अर्थात Lockdown लॉकडाऊनचे थेट परिणाम ऑटो इंडस्ट्रीवरही झाले. एका संसदीय समितीच्या माहितीनुसार कोरोना काळातील लॉकडऊनमुळं ऑटो क्षेत्राला दर दिवशी कोट्यवधींचं नुकसान झालं.
नुकसानाचा आकडा अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. दर दिवशी या लॉकडाऊनमुळं Auto क्षेत्राला तब्बल 2300 कोटी रुपयांचं नुकसान झालं. शिवाय जवळपास 3.45 लाख लोकांच्या नोकऱ्याही गेल्याची शक्यता वर्तवण्यात य़ेत आहे. मंगळवारी या समितीनं राज्यसभचे सभापती एम. वेंकैया नायडू यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल सोपवला. यावेळी वाहन क्षेत्रातील गुंतवणुक वाढवण्यासाठीचे काही उपायही सुचवण्यात आले.
लहान उद्योजकांवर वाईट परिणाम
अहवाल आणि सूत्रांच्या माहितीनुसार ऑटो क्षेत्रातील नव्या निवड प्रक्रिया जवळपास थांबल्याच आहेत. याशिवाय जवळपास 286 वाहन डिलर्च्या दुकानांना कुलूप लागलं आहे. उत्पादनातच कपात झाल्यामुळं लहान यंत्रसामग्री बनवणाऱ्या उद्योजकांवरही याचा वाईट परिणाम झाला आहे.
दर दिवशी 2300 कोटी रुपयांचं नुकसान
समितीच्या अहवालानुसार ऑटो इंडस्ट्री ऑर्गनायजेशंसच्या सुचनेप्रमाणं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं वाहनांचं उत्पादनही थांबलं. ज्यामुळं या क्षेत्रात दर दिवशी 2300 कोटींचं मोठं नुकसान झालं. सद्यस्थितीलाही ही परिस्थिती कुठवर टीकते त्यावरच या क्षेत्राची आर्थिक गणितं अवलंबून आहेत.
दोन वर्षांतील सर्वाधिक नुकसान
सध्याचं संकट पाहता अशी शक्यताही वर्तवण्य़ात येत आ की, ऑटो क्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांतील सर्वाधिक नुकसानाचं हे पर्व आहे. यामध्ये कौशल्य आणि पात्रतेचा कमी वापर केला जाईल, मिळकत कमी असेल, कंपन्या दिवाळखोरीचा सामना करु शकतात, ऑटो क्षेत्रातील नोकऱ्यांवरही याचा थेट परिणाम होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement