India Coronavirus Updates : आरोग्य मंत्रालनायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 318  लोकांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 6 हजार 317 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 6 हजार 906 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 78 हाजर 190 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. ही आकडेवारी गेल्या 575 दिवसांतील सर्वात कमी आहे. 


कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होत असतानाच दुसरीकडे चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 213 रूग्ण आढळले आहेत. यात देशाची राजधानी दिल्लीत 57 तर महाराष्ट्रात 54 रूग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 90 ओमायक्रॉनचे रूग्ण बरे झाले आहेत. 





ओमायक्रॉनमुळे सरकार सतर्क
ओमाक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंखेमुळे केंद्र आणि राज्य सरकारने सतर्कता बाळगली आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार केली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. 


लोकांमध्ये भीतीचे वातावरण
देशात ओमाक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे  लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे लोक अस्वस्त आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडाविया  (Mansukh Mandaviya) यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ओमायक्रॉनविरोधातील लढाईसाठी देशाची संपूर्ण तयारी झाली आहे. कोरोना लसीच्या उत्पादनात वाढ केली जाईल. त्यामुळे नव्या ओमायक्रॉनचा प्रसार जास्त होणार नाही अशी माहिती मंत्री मांडाविया यांनी दिली आहे. 


ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron)  विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पत्र लिहिले आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.  कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण घालण्यास सांगितले आहे. 
  
राज्याची आकडेवारी 
राज्यात काल (मंगळवार) ओमायक्रॉनच्या आणखी 11 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आठ रुग्ण मुंबई विमानतळावर झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये तर प्रत्येकी एक रुग्ण हा उस्मानाबाद, नवी मुंबईतील आणि पिंपरी चिंचवड येथील आहे.  


मुंबई विमानतळावर सापडलेल्या आठ रुग्णांपैकी प्रत्येकी एक रुग्ण हा केरळ, गुजरात आणि ठाणे येथील आहेत. तर इतर रुग्ण हे मुंबईतील आहेत. 


राज्यात कोरोनाचे 825 नवे रुग्ण
 राज्यात काल (मंगळवार)  825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 792  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 807 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. 


महत्वाच्या बातम्या