Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला असून मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 503 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 3116 नवे रुग्ण आढळले होते तर, 47 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तुलनेने आज रुग्णवाढ आणि मृत्यू कमी झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 36 हजार 168 वर पोहोचली आहे.
देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकतेचे प्रमाण 0.47 टक्के झाले आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या 4377 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 24 लाख 41 हजार 449 इतकी आहे.
आतापर्यंत 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत देशात एकूण 5 लाख 15 हजार 877 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- SIM Card : सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो? जाणून घ्या 'या' डिझाइन मागचं खरं कारण
- Holi 2022 : होळी रे होळी! होळीत केमिकलयुक्त रंग टाळा, घरच्या घरी फुलांपासून तयार रंग करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha