IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील  पिंक बॉल कसोटी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी तीन चाहते सुरक्षा व्यवस्था मोडत मैदानात उतरले. त्यापैकी एकाने विराट कोहली (Virat Kohli) सोबत सेल्फी काढण्यात यश मिळविले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या वेळेस ही घटना घडली. मोहम्मद शमीचा बॉल लागल्याने श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसवर मैदानात उपचार सुरू असताना हा प्रकार घडला. 


स्टार खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळाल्यानंतर तीन चाहते मैदानात घुसले आणि खेळाडूंच्या दिशेने धावू लागले. त्यापैकी एक जण स्लिप्सवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीच्या जवळ पोहोचण्यात यशस्वी झाला. चाहत्याने त्याचा मोबाईल काढला आणि कोहलीला सेल्फी घेण्यासाठी विचारणा केली. कोहलीने सेल्फीसाठी होकार दिल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.






                                                                                                                                 


त्यानंतर सुरक्षा कर्मचारी खेळाडूंच्या दिशेने धावले आणि काही प्रयत्नांनंतर चाहत्यांवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मोहालीतील पहिल्या कसोटीदरम्यानही एका चाहत्याला मैदानात प्रवेश करता आला. मात्र यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha