SIM Card : SIM म्हणजे Subscriber Identity Module किंवा Subscriber Identification Module. सिम कार्ड ऑपरेटिंग सिस्टम (COS) चालवणारे इंटीग्रेटेड सर्किट आहे जे आंतरराष्ट्रीय मोबाइल ग्राहक ओळख (IMSI) क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती सुरक्षितपणे संग्रहित करते. या क्रमांकांचा आणखी एक उपयोग मोबाइल किंवा टेलिफोनवर ग्राहकांना ओळख पटवण्यासाठीही केला जातो.  


मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या सिम कार्डची रुंदी 25 मिमी, लांबी 15 मिमी आणि जाडी 0.76 मिमी असते. जर तुम्ही सिमकार्ड पाहिले असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल की त्याचा एक कोपरा कापलेला असतो. जर सिमकार्डवर कटची खूण नसती तर ते मोबाईल फोनमध्ये नीट बसवणे कठीण झाले असते. मोबाईल फोनमध्ये चुकीच्या बाजूने सिम कार्ड टाकण्याचा धोका नेहमीच असतो. सिमकार्ड एका कोपऱ्यात कापले असल्यामुळे आपण सहजपणे ओळखू शकतो की मोबाइल फोनमध्ये सिमकार्ड कोणत्या बाजूला टाकायचे आहे. फोनमध्येही सिमकार्डच्या ट्रेमध्येही उजव्या बाजूने सिम बसवण्याची खूण असते.


सिम कार्डच्या एका कोपऱ्यावर कट चिन्हाचे मुख्य कारण म्हणजे सिम कार्ड आणि मोबाईल फोन कार्डधारकाचा पिन यांचा योग्य संपर्क प्रस्थापित करणे. सिम कार्डचा पिन क्रमांक 1 मोबाईल फोनच्या संबंधित पिनशी जोडलेला असावा लागतो. सिम कार्डवरील कट मार्क मोबाइल फोनमध्ये सिम कार्ड योग्य प्रकारे बसवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्म करते.


महत्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha