Corona Cases : देशात 24 तासांत कोरोनाच्या 6 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 247 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus in India : देशात गेल्या 24 तासांत 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 87,562 सक्रिय रुग्ण आहेत.
Coronavirus in India : देशात बुधवारी कोरोनाच्या 6,984 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 87,562 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत देशात 3,41,46,931 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 4,76,135 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 1,34,61,14,483 डोस देण्यात आले आहेत. तर 6,984 दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये 3,377 रुग्ण फक्त केरळातीलच आहेत.
दुसरीकडे देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 61 वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी चार नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यासोबतच देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढून 61 वर पोहोचली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आणखी चार जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी आठ रुग्णांची नोंद
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी आठ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सात तर वसई विरारमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. राज्यात आत्तापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
काल (मंगळवारी) आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण रुग्णालयात आणि सहा जण घरी विलगीकरणात आहेत. या आठ रुग्णांपैकी तीन महिला आणि पाच पुरुष आहे. विदेशातून आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. ओमायक्रॉनबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना विलगीकरणातही ठेवण्यात येईल.
राज्यात ओमायक्रॉनचे 28 रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबईत सात तर वसई विरारमध्ये एक ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 28 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 12, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये दोन, कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरारमध्ये एक रुग्ण आढळले आहेत. 28 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात मंगळवारी 684 कोरोनाबाधितांची नोंद
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 684 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 हजार 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद
राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैक सात रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण वसई विरार येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.