एक्स्प्लोर

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 729 रुग्णांची नोंद; 221 मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एक लाख 48 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत.

Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. पण अद्याप धोका टळलेला नाही. देशात अद्यापही दैनंदिन मृतांचा आकडा जास्त आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 729 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 221 रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 59 हजार 873 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एक लाख 48 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 24 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

लसीकरणाचा आकडा 107 कोटींच्या पार 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनाच्या 5 लाख 65 हजार 276 लसीचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे. 

राज्यातील 1141  तर मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी हजाराच्या जवळपास स्थिर आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांना जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 1,141 रुग्णांची भर पडली आहे तर एकूण 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात एकूण 1,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64,56,263 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.6 टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 15 हजार 062  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,86,432 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 878  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,30,47,584 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 4160 सक्रिय रुग्णसंख्या असून त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतोय. पुणे जिल्ह्यात 3190 सक्रिय रुग्णसंख्या आहे. जळगाव (8), नंदूरबार (1),  धुळे (1), जालना (28), बीड (59),  लातूर (35),  परभणी (39), हिंगोली (20), नांदेड (22),  अकोला (20), अमरावती (17),  वाशिम (02), अकोला (20), बुलढाणा (08), नागपूर (36), यवतमाळ (05), वर्धा (7), भंडारा (2), गोंदिया (2),  चंद्रपूर (18) गडचिरोली (3) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत 330 रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्याही सध्या स्थिरावली असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात शहरात 330 रुग्णांची नोंद झाली तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 1642 दिवस इतका झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Embed widget