Covid19 : नव्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली, देशात 9520 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus Cases Today : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 9 हजार 520 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात 10 हजारांहून कमी नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी गुरुवारी दिवसभरात 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील काही दिवस देशात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. याआधी 22 ऑगस्टला 10 हजारहून कमी रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी देशात 736 कोरोना रुग्णांची घट झाली आहे.
देशात 12,875 रुग्ण कोरोनामुक्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 12 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 875 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात कोरोनाचे 87 हजार 311 सक्रिय रुग्ण आहेत. देशात सध्या दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.50 टक्के आहे. तर आठवड्याचा रुग्ण सकारात्मकता दर 2.80 आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.62 टक्के आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 27, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/4xTeQiQtzB pic.twitter.com/bzoWhe1Nm9
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या स्थिर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Maharashtra Corona Update) स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 1846 नव्या रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांना आपला जीव (Maharashtra Corona Death) गमवावा लागला आहे. राज्यात शुक्रवारी एकूण 2240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,33,033 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.02 इतकं झालं आहे. तर राज्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर हा 1.83 इतका झाला आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत
राज्यात सध्या 11,827 इतक्या सक्रिय रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबई शहरात असून ती 5392 इतकी आहे. मुंबई खालोखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 2368 इतकी आहे.