Covid19 : कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, देशात पाच हजारहून अधिक नवे रुग्ण
Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ (Corona Update) झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात पुन्हा वाढ (Corona Update) झाली आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा पाच हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही संख्या काल चार हजारांच्या खाली पोहोचली होती. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत 739 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 45 हजार 746 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे. कोरोना
आतापर्यंत 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या
देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत एकूण 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19 लाख 25 हजार 881 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 1.44 टक्के आहे. देशभरात मंगळवारी दिवसभरात 3 लाख 55 हजार 231 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
#COVID19 | India reports 5,108 fresh cases and 5,675 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 14, 2022
Active cases 45,749
Daily positivity rate 1.44% pic.twitter.com/8pLlkkonRx
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या घसरली
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्क्यांवर आले आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 730 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 1075 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात चार कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,58, 170 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.10 टक्के इतकं झालं आहे
'दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचला असता'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) अनेकांनी आपला जीव गमावला. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण (Increasing Corona Patient), रुग्णालयात खाटा (Shortage of Bed) आणि ऑक्सिजनची कमतरता (Shortage of Oxygen), औषधांचा तुटवडा (Medicine Shortage) यांमुळे दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. जर सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर अनेक रुग्णांचा जीव वाचवता आला असता, असं म्हणत संसदीय समितीने सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. संसदीय स्थायी समितीने राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या