Coronavirus Cases Today : कोरोनाचा वेग मंदावतोय! देशात 3615 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांवर
India Corona Updates : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात 3 हजार 615 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा वेग (India Corona Updates) मंदावतोय. देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात 3 हजार 615 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 230 इतकी होती. कालच्या दिवसातील रुग्णसंख्येच्या तुलनेने 385 रुग्णांची वाढ झाली असली, तरी हा आकडा तीन हजारांवर असणे ही एक दिलासादायक बाब आहे. कारण जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोबाधितांची संख्या तीन हजारांपर्यंत खाली घसरली आहे. देशात कोरोनाच्या आलेखामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसातील कोरोनाचा आलेख
- 28 सप्टेंबर 2022 - 3615
- 27 सप्टेंबर 2022 - 3230
- 26 सप्टेंबर 2022 - 4129
- 25 सप्टेंबर 2022 - 4777
- 24 सप्टेंबर 2022 - 4912
- 23 सप्टेंबर 2022 - 5383
- 22 सप्टेंबर 2022 - 5443
- 21 सप्टेंबर 2022 - 4510
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 28, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/OlUCvpVdn5 pic.twitter.com/u8imoA0BYL
सलग पाच दिवस कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 385 रुग्णांची वाढ झाली आहे. मात्र चांगली बाब म्हणजे कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या देशात 40 हजार 979 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. काल ही संख्या
#LargestVaccineDrive#AmritMahotsav
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 27, 2022
➡️India’s cumulative vaccination coverage crosses 217.94 Crore
➡️More than 10 lakh Vaccine doses administered today till 7 pmhttps://t.co/CpGFqvlE4s pic.twitter.com/0KFVi0BBEI
देशात 4 कोटींहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 972 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाख 9 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 217 कोटीहून (Coronavirus Vaccination) अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे.