Covid19 Updates : कोरोनाचा धोका कायम! देशात कोरोनाचे 24 हजार सक्रिय रुग्ण
Coronavirus Cases Today : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात 24 हजार 43 कोरोना उपचाराधीन रुग्ण आहेत.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत आहे. यादरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या सात अंकांनी किंचित घटली आहे. पण कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं ही नव्या व्हेरियंट बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. देशात 2112 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 2119 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्याही घटली आहे.
ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत
कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे हे तीन नव व्हेरियंट ओमायक्रॉनहून अधिक संसर्गजन्य असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी सरकारही गंभीर झालं आहे. मंगळवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड चाचण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.
Single-day rise of 2,112 new infections pushes India's COVID-19 tally of cases to 4,46,40,748, death toll climbs to 5,28,957: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 22, 2022
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर
मागील 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 957 वर पोहोचली. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे. सध्या देशात 24,043 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 102 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 22, 2022
➡️ India’s Cumulative #COVID19 Vaccination Coverage exceeds 219.53 Cr (2,19,53,88,326).
➡️ Over 4.12 Cr 1st dose vaccines administered for age group 12-14 years.https://t.co/W0YXOkQ4fH pic.twitter.com/u8CTUkXUAj
जागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पाचव्या लाटेची धोका असल्याचंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) XBB व्हेरियंटमुळे प्रशासनासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत. सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे. जगभरात BF.7, XBB आणि BA.5 हे नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. चीन, इंग्लंडसह अनेक देशांमध्ये नवे व्हेरियंट वेगाने पसरत आहेत.