Coronavirus Cases India : भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. दरम्यान, आकड्यांवरुन कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. परंतु, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3847 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 83 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच, काल सक्रिय रुग्णसंख्या 75,684 कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 208,921 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 4157 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


26 मेपर्यंत देशभरात 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 33 कोटी 70 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 22 लाख कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील कोरोनाची आजची स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 73 लाख 69 हजार 

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 46 लाख 33 हजार 951

  • एकूण सक्रिय रुग्ण : 24 लाख 19 हजार 907

  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 3 लाख 15 हजार 235 


देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर आहे, तर रिकव्हरी रेट 89 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 10 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


राज्यात बुधवारी डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक


राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.  राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार की निर्बंध शिथिल होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित


राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याचंही कळतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.


राज्यात सध्या 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. सरकारने लागू केलेल्या या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्यामुळे लॉकडाऊन उठवावा अशी मागणी व्यापाऱ्यांपासून नागरिक करत आहेत. आजच्या बैठकीत लॉकडाऊन संपूर्ण उठणार का, निर्बंध शिथिल होणार की लॉकडाऊन कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.


राज्यातील कोणकोणते जिल्हे रेड झोनमध्ये?


राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती. बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :