(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 2528 नवीन कोरोनाबाधित, 149 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात कोरानाचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याचं चित्र आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 3 हजार 997 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 181 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 0.40 इतका झाला आहे.
India reports 2,528 fresh #COVID19 cases, 3,997 recoveries, and 149 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 18, 2022
Active case: 29,181 (0.07%)
Daily positivity rate: 0.40%
Total recoveries: 4,24,58,543
Death toll: 5,16,281
Total vaccination: 1,80,97,94,58 pic.twitter.com/PhvoxNiXxV
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 5,16,281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, देशात गेल्या 24 तासांत 3997 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 180 हून अधिक डोस देण्यात आले आहेत.
भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या आटोक्यात आला असून रुग्णवाढीचा आलेखही खूप कमी आहे. परंतु शेजारील चीन आणि युरोपमधील काही देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनत आहे. गेल्या काही आठवड्यांत तेथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारताचीही चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव यांना पत्र लिहून काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- China Corona : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीनमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडचणीत
- होळीनिमित्त तेल कंपन्यांचं सर्वसामान्यांना गिफ्ट; पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ नाही, आजचे दर काय?
- IPL 2022 पूर्वी ग्लेन मॅक्सवेलचं विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha