एक्स्प्लोर
स्टेशनवरील मोफत वायफाय वापरत हमालाने 'केपीएससी' क्रॅक केली!
केरळमधील एर्नाकुलम जंक्शनवर कुलीचं काम करणाऱ्या के श्रीनाथने राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे फावल्या वेळात स्टेशनवरील फ्री वायफाय वापरुन त्याने हे यश मिळवलं आहे.
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम जंक्शनवर कुलीचं काम करणाऱ्या के श्रीनाथने राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे फावल्या वेळात स्टेशनवरील फ्री वायफाय वापरुन त्याने हे यश मिळवलं आहे.
केरळच्या एर्नाकुलम जंक्शनवर के श्रीनाथ हा तरुण कुली म्हणजेच हमालाचं काम करतो. स्टेशनवरील फ्री वायफायच्या माध्यमातून त्याने इंटरनेटवरुन फ्री प्रश्नपत्रिका सोडवून, तसंच तयारीचे व्हिडीओ पाहून केपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला.
गुगल आणि वायफायमुळे माझं आयुष्य बदललं आहे. मी इंटरनेटवरुन फ्री प्रश्नपत्रिका डाऊनलोड केल्या आणि तयारीसाठी अनेक व्हिडीओही पाहिले. या साऱ्यासाठी स्टेशनवरील मोफत इंटरनेटचा मला खूप फायदा झाला, असं श्रीनाथने सांगितलं.
मोफत इंटरनेट मिळालं की त्याचा कसाही वापर केला जातो. मात्र एर्नाकुलममधील के श्रीनाथचा आदर्श तरुणांनी घेतला, तर त्यामुळे नक्कीच सकारात्मक फरक पडेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement