एक्स्प्लोर

कुलभूषण प्रकरणी पाकचा आडमुठेपणा, भारत ICJकडे दाद मागण्याची शक्यता

पाकिस्ताननं आज कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा राजनयिक मदत (कौन्सुलर एक्सेस) मिळू दिली नाही. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे (आयसीजे) दाद मागण्यावाचून पर्याय उरला नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

नवी दिल्ली: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा  कौन्सुलर एक्सेस मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. याबाबत भारताच्या परराष्ट्र खात्यानं पत्रकार परिषद घेतली. याप्रकरणी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे)चा दरवाजा ठोठोवू शकतो, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केलंय.
परराष्ट्र मंत्रालयानं घेतलेल्या या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं की, २ सप्टेंबरला मिळालेला कौन्सुलर एक्सेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) निर्देशानुसार मिळाला होता. आम्ही पाकिस्तानला नेहमीच 'आयसीजे'च्या निर्देशांचं पालन करण्याबाबत सांगितलं आहे. आम्ही अजूनही पाकिस्तानच्या संपर्कात आहोत.
पाकिस्ताननं नुकतंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीमध्ये काश्मिर आणि तिथल्या सद्यस्थितीची मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना रवीश कुमार म्हणाले की,  पाकिस्तानला यावर राजकारण करायचंय हे स्पष्ट आहे. पाकिस्तानचा दुतोंडीपणा आणि दहशतवादाला तो करत असलेली मदत जगाला माहित आहे. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहे. खोटा प्रचार करण्याचा पाकिस्तानचा सदैव प्रयत्न राहिलाय. ४-५ वेळा एकंच खोटं सांगितल्यानं ते खरं ठरत नाही. जगाला पाकिस्तानचा हा खोटारडेपणा माहित आहे.
कुलभूषण जाधव यांना 'हेरगिरी आणि दहशतवादा'च्या आरोपांखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं एप्रिल २०१७मध्ये मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारतानं 'आयसीजे'मध्ये जाऊन जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती ज्यात भारताला यशही आलं. यापूर्वी कुलभूषण यांच्या आई व बहिण यांना पाकिस्ताननं भेटायची परवानगी दिली होती. मात्र, कुलभूषण यांच्याशी भेटीदरम्यान पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला गेल्याचंही समोर आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
CJP विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार, देशभर वकिलांची फौज एकत्र करणार, कपिल सिब्बल यांच्याकडून कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी
सीजेपी विद्यार्थी आंदोलकांसाठी वकिलांचं देशव्यापी नेटवर्क उभारणार, कपिल सिब्बल यांच्याकडून एक कोटींचा निधी जाहीर
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Embed widget