Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेस आज भारत जोडो यात्रा लॉंच करणार? लोगो आणि प्रचार करण्यासाठी सज्ज
Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असून 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.
Congress Bharat Jodo Yatra : आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) काँग्रेस (Congress) पक्ष 'भारत जोडो यात्रे'चा लोगो आणि प्रचारासाठी सज्ज झाला आहे. आज दुपारी 12 वाजता काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या दरम्यान ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.
प्रमुख व्यक्तींसोबत बैठक
'भारत जोडो यात्रे'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये देशभरातील नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रमुख व्यक्तींसोबत बैठक घेतली. या वेळी 'स्वराज इंडिया'चे योगेंद्र यादव आणि इतर अनेक सामाजिक आणि खासगी संस्था या बैठकीला उपस्थित होत्या.
भारत जोडो यात्रा कधीपासून सुरू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस ही ऐतिहासिक 'भारत जोडो यात्रा' 7 सप्टेंबरपासून सुरू करणार आहे. याची सुरुवात तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून होईल आणि हा प्रवास 3500 किमी अंतर कापून काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसच्या मते या यात्रेत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक लोक सहभागी होऊ शकतात.
जनतेला फूट पाडण्याचे राजकारण नको - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरी समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नमूद केले आहे की, या भारत जोडो यात्रेत त्यांच्यासोबत कोणीही असो किंवा नसो, ते एकटेच ही यात्रा पूर्ण करण्यास सक्षम आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच भारतातील जनतेला फूट पाडण्याचे राजकारण नको आहे, जोडण्याचे राजकारण हवे आहे. असे देखील राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी महत्त्वाची भूमिका बजावणार
भारत जोडो यात्रेमध्ये पदयात्रा ते रॅली तसेच जाहीर सभांचा समावेश आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी ते प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते सहभागी होऊ शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या या यात्रेकडे आगामी निवडणूक लढाई म्हणून पाहिले जात आहे.
मोदी सरकारविरोधात निवडणूक लढवणार
या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावणारे राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये उतरून मोदी सरकारविरोधात निवडणूक लढवताना दिसणार आहेत. 22 ऑगस्टला म्हणजेच सोमवारी राहुल गांधी दिल्लीत नागरी समाजातील लोक आणि संघटनांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेतील आणि सर्व मुद्द्यांवर त्यांचे मतही मांडतील असे सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेशोत्सवाची ओढ! पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर, 'या' मुर्तींना मागणी अधिक
Todays Headline 23rd August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
High Court : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी