एक्स्प्लोर

अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये निवडणूक होणार?

निवडणूक पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता असून गांधी कुटुंबातला कुठलाही सदस्य त्यामुळे यावेळी अध्यक्षपदाच्या रिंगणात नसेल असं म्हटलं जातंय.

नवी दिल्ली : राहुल गांधींनंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्वसहमतीने नाव शोधण्यात अपयश आल्याने पक्षाला हाच मार्ग उपलब्ध असल्याचं दिसतंय. या निवडणुकीत गांधी परिवारातला कुठला सदस्य सहभागी होणार नाही असंही कळतंय. राहुल गांधींनंतर कोण? याचा फैसला आता निवडणुकीनेच करण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते. गेल्या पन्नास दिवसांपासून हा घोळ सुरु आहे, कुठल्या एका नावावर सहमती होताना दिसत नाही. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत गांधी कुटुंब कुठल्याही पद्धतीनं सहभागी व्हायला तयार नाही, त्यामुळेच ही प्रक्रिया पुढे जात नाही. अशा स्थितीत निवडणूक हाच योग्य पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारणं, नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया हे सगळं ज्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत आहे, ती बैठक गेल्या महिनाभरापासून बोलावलीच जात नाहीये. कधी कर्नाटकच्या घोळाचं कारण, तर कधी संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचं कारण... आता 22 जुलैपर्यंत ही बैठक पुढे ढकलली गेल्याचं सांगितलं जातंय. अध्यक्षपदाची निवडणूक कशी, कधी असणार याचा आराखडा वर्किंग कमिटीच्या बैठकीतच ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही प्रक्रिया महाराष्ट्र, झारखंड, हरियाणाच्या निवडणुकीनंतरही होऊ शकते. तोपर्यंत या संदर्भातलं कामकाज पाहण्यासाठी एका ज्येष्ठ महासचिवाची नियुक्ती बैठकीत होऊ शकते. पन्नास दिवस झाल्यानंतर काहींनी दबक्या आवाजात प्रियंका गांधी यांचंही नाव पुढे करायला सुरुवात केली. पण राहुल गांधी यांनी राजीनामा देतानाच मी राजीनामा देतोय म्हटल्यावर लगेच प्रियंकाचं नाव सुचवू नका असं म्हटलं होतं. गांधी कुटुंबातला कुठलाही सदस्य त्यामुळे यावेळी अध्यक्षपदाच्या रिंगणात नसेल असं म्हटलं जातंय. सीताराम केसरींच्या काळात अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली होती त्याची यानिमित्तानं आठवण होणं साहिजक आहे. निवडणुकीने अध्यक्षपदाची निवड होते तेव्हा गटबाजीचाही धोका असतो. त्यातच सध्या काँग्रेस इतकी दुबळी झालीय, की उघडपणे अशी लढाई झाल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकेल अशी काहींची चिंता आहे. गांधी परिवाराने 20 वर्षे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सांभाळल्यानंतर आता ते गांधी घराण्याबाहेर जाणार आहे. हे स्थित्यंतर सफाईदारपणे होतं की आधीच उद्धवस्त झालेल्या पक्षाला या प्रक्रियेत आणखी तडे बसतात हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget