एक्स्प्लोर

Congress: काँग्रेस वर्किंग कमिटीची लवकरच नवी रचना, सोनिया, राहुल गांधींना वर्किंग कमिटीत कायमचं स्थान मिळणार?

Congress : सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी स्थान दिलं जाण्याचीही शक्यता आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांचा असा समावेश होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली :  काँग्रेस वर्किंग कमिटी (Congress Working Committee) या काँग्रेस (Congrss)  पक्षाच्या सर्वोच्च समितीसाठी आता निवडणुका होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यांत काँग्रेसच्या महाअधिवेशनात या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. सोनिया (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi)  या दोन माजी अध्यक्षांचं काय होणार? वर्किंग कमिटीत त्यांना नेमकं काय स्थान असणार याचीही चर्चा आहे.  

अध्यक्षपदापाठोपाठ आता काँग्रेस वर्किंग कमिटीचीही निवडणूक होणार?  काँग्रेसचं महाअधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसच्या या नव्या रचनेसंदर्भात मोठं पाऊल पडण्याची शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी स्थान दिलं जाण्याचीही शक्यता आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांचा असा समावेश होण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. 

कशी असते या कमिटीची रचना आणि काय महत्त्व? 

  •   वर्किंग कमिटीत (Working Committee) एकूण 25 सदस्य असतात
  •    पक्षासाठी निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती
  •     एक अध्यक्ष, एक संसदीय पक्षाचा नेता आणि इतर 23 सदस्य अशी रचना
  •    यापैकी 12 सदस्य हे निवडणुकीद्वारे यावेत अशी अपेक्षा असते
  •   तर बाकीचे अध्यक्षांकडून नियुक्त होत असतात

वर्किंग कमिटीसाठी निवडणूक व्हावी ही जी 23 गटाचीही मागणी होती. त्यामुळे आता अध्यक्षपदापाठोपाठ इथेही काँग्रेस (Congress) निवडणुकीनं नियुक्त्या करणार का हे पाहावं लागेल.  24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये काँग्रेसचं हे महाअधिवेशन होण्याची शक्यता आहे. या वर्षात ज्या राज्यात निवडणुका आहेत. त्यापैकी एक छत्तीसगड. लोकसभा निवडणुकीला एक वर्षे उरलं असताना काँग्रेस वर्किंग कमिटीतल्या या निवडणुका पक्षात नेमका काय बदल घडवतात हे ही पाहणं महत्वाचं असेल.  भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप येत्या 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसचं हे महाअधिवेशन पक्षाचा मोठा इव्हेंट असेल. त्यातून पक्षाला कशी आणि किती बळकटी येते हे पाहावं लागेल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी बालपणी आईला विचारले, मी सुंदर आहे का? सोनिया गांधींनी दिलं आश्चर्यकारक उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरMumbai Air Way : दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणामABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Embed widget