एक्स्प्लोर
भाजपाला हरविण्यासाठी कॉंग्रेसला प्रत्येक राज्यात आघाडी गरजेची : पी. चिदंबरम
कर्नाटक पोटनिवडणुकांचा नुकताच निकाल लागला आहे. त्यात भाजपचा सपशेल पराभव झाला तर कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला यश मिळाले आहे. कॉंग्रेस-जेडीएसने पाच पैकी 2 लोकसभा आणि 2 विधानसभा जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला.
नवी दिल्ली: आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक राज्यात घटक पक्षांसोबत कॉंगेसला आघाडी करावी लागेल, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीला कर्नाटकातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशानंतर चिदंबरम बोलत होते. अशा आघाड्या अन्य राज्यातही होणं गरजेच आहे. तेव्हाच कर्नाटकसारखे निकाल पाहायला मिळेल, असे पी. चिदंबरम म्हणाले.
चिदंबरम यांना पश्चिम बंगाल येथील आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला बगल दिला. ते म्हणाले की, "यासंबधी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी निर्णय घेईल."
मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यांनी केलेल्या कोणत्याच घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जूना हिंदुत्वाचा मुद्दा उकरून काढला आहे, अशा शब्दात चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली.
कर्नाटक पोटनिवडणुकांचा नुकताच निकाल लागला आहे. त्यात भाजपचा सपशेल पराभव झाला तर कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला यश मिळाले आहे. कॉंग्रेस-जेडीएसने पाच पैकी 2 लोकसभा आणि 2 विधानसभा जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement