एक्स्प्लोर

काँग्रेस-राष्ट्रवादीनं राम मंदिर निर्माणात हातभार लावावा : संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनेही राम मंदिर निर्माणात हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलंय.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असताना याकडे राजकाराणापेक्षा धार्मिक भावनेनं पाहावं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना इतर पक्ष आणि शिवसेनेच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना राऊत यांनी काँग्रेस-एनसीपीनं राम मंदिर निर्माणात हातभार लावावा अशी भावना व्यक्त केली. राम मंदिर ही कोणचीही एकाची प्रॉपर्टी नाहीय, तर हे मंदिर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. या मंदिर निर्माणात शिवसेना सहभागी होणार असून त्याचबरोबर इतरांनी हातभार लावण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं. कसा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दुपारच्या दरम्यान दाखल होतील त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होईल, त्यानंतर साडेचार वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील. पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. ...तर हिंदूत्वाची व्याख्या बदलावी लागेल; संजय राऊत यांचा हिंदू महासभेला टोला अयोध्या दौऱ्यावर कोरोनाचं सावट कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरयू तीरावराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या हिरमोड झाला आहे. नियोजित दौऱ्यानुसार उद्धव ठाकरे हे शरयू तीरावर आरती करणार होते. पण उत्तर प्रदेश सरकारचा जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होतील. अयोध्येत शिवसैनिकांची गर्दी आणि जोरदार होर्डिगबाजी अयोध्येत उद्धव ठाकरे प्रभू रामचंद्राच्या दर्शनसाठी येत असल्यामुळे अयोध्यानगरीत शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळतंय. अयोध्येच्या प्रत्येक चौकाचौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. लखनऊ विमानतळापासून ते अयोध्यानगरीपर्यंत शिवसेनेचे होर्डिंग पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात विविध भागासह दिल्ली उत्तर प्रदेशातले शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येत दाखल झाले आहेत. मुंबईहून आलेल्या शिवसैनिकांचं अयोध्यामध्ये ढोल ताशा आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं. Sanjay Raut | चलो अयोद्धा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला रामलालाचं दर्शन घेणार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget