एक्स्प्लोर

Rahul Gandhi : द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत

Rahul Gandhi on Election 2022 : उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत आहे.

Rahul Gandhi on Election 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.  उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील आता सज्ज झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत आहे. द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, असं ट्वीट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलं आहे.  

सर्वच पक्षांकडून विजयी होण्याचा सूर 

दुसरीकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तरप्रदेशात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. भाजपने पूर्ण बहुमतासह 300 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्याच वेळी, सपानं आयोगाकडे डिजिटल स्पेससाठी नियम बनवण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष निवडणुकांचा विश्वास व्यक्त करत बसपानं कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवक, शेतकरी, महिला, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचा पुनरुच्चार केला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाकडून निर्बंध लागू

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.  15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. 

कोणत्या राज्यात कधी मतदान?
उत्तर प्रदेश 
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा  - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान

पंजाब - 14 फेब्रुवारी  2022
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget