एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

National Herald Case : पहिल्या टप्प्यात तीन तास चौकशी, ब्रेकमध्ये सोनिया गांधींच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा ED कार्यालयात

National Herald Case : काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रेकनंतर पुन्हा ईडी कार्यालयात हजर झाले. ब्रेकमध्ये त्यांनी सोनिया गांधी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी चौकशी करत आहे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लंच ब्रेकनंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) चौकशीनंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले. राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये बँक अकाऊंटसह अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. यानंतर राहुल गांधी ईडी (ED) कार्यालयातून बाहेर पडून तुघलक लेन इथल्या आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. इथून ते दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात गेले. इथे त्यांची आई सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. 

दुसरीकडे राहुल गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते (Congress Protest) रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करत आहेत. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नेशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीचं कर्ज फेडलं असून कर्मचाऱ्यांना पगारही दिला आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारताच्या सरकारी मालमत्ता विकलेली नाही. राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाल्याने काँग्रेसने देशभरात ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचं समन्स
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. राहुल गांधी यांना यापूर्वी 2 जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीने त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत. सध्या त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? 
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या 'यंग इंडिया' या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयानं राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीचे नेते एकत्रित आझाद मैदानावर पाहणी करणारMahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेगCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Embed widget