(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे नव्हे तर एक्साईज करामुळे पेट्रोलच्या किंमती वाढल्या; काँग्रेसचा दावा
Petrol Diesel Price : काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील पेट्रोलच्या किंमतीवाढीमागे केंद्र सरकारचा एक्साईज कर कारणीभूत असल्याचा दावा केला.
नवी दिल्ली: देशातील वाढत्या महागाईवरुन काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्याचा सरकारचा दावा चुकीचा असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. केंद्र सरकारने लावलेल्या एक्साईज करामुळे पेट्रोलच्या किंमती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "गेल्या चार दिवसांपासून देशातील पेट्रोलची किंमत सातत्याने वाढत आहे. मे 2014 साली ज्यावेळी मोदी सत्तेत आले त्यावेळी पेट्रोलवरील एक्साईज कर हा 9.20 रुपये तर डिझेलवरील एक्साईज कर हा 3.46 रुपये इतका होता. गेल्या आठ वर्षांमध्ये या करामध्ये डिझेलमध्ये 531 टक्क्यांची तर पेट्रोलमध्ये 203 टक्क्यांची वाढ झाली आहे."
सुरजेवाला पुढे म्हणाले की, "डॉ. मनमोहन सिंह ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी 1.64 लाख कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली होती. आता ही सबसिडी कमी करण्यात आली असून त्यामुळे देशातील पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे."
मोदी सरकार में महंगाई-
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 26, 2022
"तारीख़ नई, तकलीफ़ वही"
आज की सुबह भी महंगाई से शुरू
आज फ़िर से रेट ₹0.80 बढ़ा दिए..
नए भारत में डीज़ल/पेट्रोल का रोज़ नया रेट
लगातार 5 दिन 4 हमला, ₹3.2/L की लूट..
भाजपा का जारी है- 'ज़श्न भरा शपथ'
जनता को हर रोज़ महंगाई की चपत?#PetrolDieselPriceHike pic.twitter.com/c24DFTf6uI
महत्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price Hike: का वाढतायंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कारण...
- Petrol Diesel Price Hike : इंधन दरात मागील 5 दिवसातील चौथी वाढ, पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार
- Fuel Price Hike : ...तर, रिलायन्सच्या पेट्रोल पंपला पुन्हा टाळं लागणार, जाणून घ्या कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha