एक्स्प्लोर

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना

दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र याला एनएसयूआयने आक्षेप घेतला होता. यावरुन विद्यापीठात तणावाचं वातावरण होतं.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेसप्रणित 'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंह आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. अभाविप प्रमुख शक्ती सिंह यांच्या पुढाकाराने हे पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र याला एनएसयूआयने आक्षेप घेतला होता. यावरुन विद्यापीठात तणावाचं वातावरण होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवला जाऊ शकत नाही, असा आक्षेप 'एनएसयूआय'ने घेतला. त्यानंतर गुरुवारी (22 ऑगस्ट) 'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत, 'भगतसिंह अमर रहें' आणि 'बोस अमर रहें' अशी घोषणाबाजीही केली. शिवाय त्यांच्या कृत्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना वाचवण्यात आलं : तुषार गांधी सोलापुरात पडसाद या घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले आहेत. सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांकडून सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर निषेध करुन एनएसयूआयच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, स्वातंत्रवीर सावरकरांचा विजय असो, एनएसयूआय मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | मारहाणीचा विषय दीड वर्षांपूर्वीचा, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Headlines : 3 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaAjay Munde PC Beed : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, अजय मुंडे यांचे Suresh Dhas यांच्यावर टीकास्त्रAjay Munde On Suresh Dhas:'सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत ते दिसतंय त्यांचा खोक्या बाहेर पडलाय'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Embed widget