(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : सोनिया गांधींच्या हस्ते ध्वजारोहण; मात्र झेंडा फडकवताना थेट खाली कोसळला, पण...
काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 137 वर्ष झाली, त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 137 वर्ष झाली आहेत (congress 137th foundation day). या निमित्ताने विविध राज्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) ध्वजारोहण करताना दिसत आहेत. पण सोनिया गांधी ध्वजारोहण करत असतानाच काँग्रेस पक्षाचा ध्वज दोर तुटला आणि तो ध्वज सोनिया गांधी यांच्या हातावर पडला. ध्वजाची दोरी व्यवस्थित बांधण्यात आली नव्हती. त्या कारणामुळे ही घटना घडली, असं म्हटलं जातंय. पक्षाचा ध्वज सोनिया गांधी यांच्या हातात परडताच तो ध्वज पवन बंसल आणि के सी वेणुगोपाल यांनी हातात धरला.
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या विशेष कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच पक्षाचे नेते उपस्थित होते. तसेच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
#WATCH | Congress flag falls off while being hoisted by party's interim president Sonia Gandhi on the party's 137th Foundation Day#Delhi pic.twitter.com/A03JkKS5aC
— ANI (@ANI) December 28, 2021
ट्रेनिंग अभियानाबद्दल दिली माहिती
पक्षाच्या समिती सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने देशभरातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी ट्रेनिंग अभियानाचे आयोजन केले आहे. जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर जवळपास 5500 ट्रेनर्स तयार करण्यात येणार आहेत. जे पक्षाबद्दल सर्वांना माहिती देतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- COVID-19 Vaccine : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण; असा बुक करा स्लॉट
- लसीच्या बुस्टर डोसने कोरोनाचा प्रसार थांबेल? सरकारच्या निर्णयावर तज्ञांकडून प्रश्न उपस्थित
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा