एक्स्प्लोर

आजपासून पेट्रोल पंपावरही 500 च्या जुन्या नोटा बंद!

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर काही महत्वाच्या ठिकाणी जुनी पाचशेची नोट स्विकारली जात होती. मात्र आजपासून जुनी नोट स्वीकारण्याची मुभा दिलेल्या ठिकाणांमधून पेट्रोल पंप, विमान तिकीट आणि गॅस यांना वगळण्यात आलं आहे. विमान तिकीटासाठी नॉन कॅश फॅसिलिटी आणि स्वाईप सुविधा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर पेट्रोल पंपांवर गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर महत्वाच्या ठिकाणी सरकारने जुन्या नोटा स्विकारण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली होती. मात्र 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल पंप आणि विमान तिकीटांसाठी जुन्या पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान अन्य महत्वाच्या ठिकाणी जुन्या पाचशेच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्विकारल्या जाणार आहेत. यामध्ये रेल्वे, एसटी, रुग्णालये, शाळेची फी, प्रीपेड मोबाईल रिचार्ज यांसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. 1000 रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर तर यापूर्वीच म्हणजे 24 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आला आहे. देशभरात टोल पुन्हा सुरु राज्यासह देशभरात आजपासून पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाली आहे. नोटाबंदीनंतर सरकारने 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केली होती. मात्र ही मुदत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपल्याने आज टोलनाक्यावर पुन्हा वसुलीला सुरुवात झाली आहे. वसुलीमुळे टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या वर टोल असल्यास 500 ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र यामध्ये काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोलनाक्यावर 15 डिसेंबरपर्यंत जुनी नोट देता येणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हजार रुपयांच्या नोटा बँकाशिवाय अन्य ठिकाणी स्वीकारण्याला मनाई करण्यात आली असली, तरी पेट्रोल पंप तसंच विमान प्रवासांच्या तिकीटासाठी त्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती. ही मुभा 15 डिसेंबरपर्यंत असेल, असंही त्याचवेळी जाहीर करण्यात आलं होतं. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थ व्यवहार सचिवांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, देशभरातील टोल नाके 2 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार होते, त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तो आदेशही रद्द झाला आहे. 3 डिसेंबरपासून म्हणजेच 2 आणि 3 तारखेच्या मध्यरात्री टोलनाके सुरु होतील, मात्र तिथे पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. अगदी सुरुवातीला म्हणजे 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय जाहीर करताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी फक्त 72 तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने ही मुदत तब्बल पाचवेळा वाढवण्यात आली. आताच्या नव्या निर्णयानुसार, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा, 3 डिसेंबरपासून फक्त टोलनाके आणि पेट्रोलपंपावर स्वीकारल्या जाणार नाहीत.   इथे मुदत कायम त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महापालिकांची थकबाकी किंवा पाणीपट्टी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये भरण्यासाठी आधी दिलेली 15 डिसेंबरची मुदत कायम राहणार आहे. तसंच रेल्वे प्रवासाच्या तिकीटासाठीही जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. थोडक्यात, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी आधी परवानगी दिलेल्या ठिकाणांपैकी जी ठिकाणे थेट सरकारच्या अधिपत्याखाली येतात किंवा ज्यामध्ये खाजगी क्षेत्रांचा सहभाग नसेल, तिथेच फक्त 15 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. टोलनाके, पेट्रोलपंप किंवा विमान वाहतूक कंपन्या यांच्यावर सरकारचं थेट नियंत्रण नसल्यामुळे कदाचित त्यांना जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास 3 डिसेंबरपासून मनाई करण्यात आली असावी. टोलनाके, पेट्रोलपंप किंवा विमान वाहतूक कंपन्यांचं तिकीट बुकिंग याठिकाणी जुन्या नोटांच्या आदलाबदलीत मोठे गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरुन हा निर्णय घेतला असण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. नोटाबंदीनंतर 500 च्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेत बदलू शकता. तसंच 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेतही जुन्या नोटा बदलू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget