Covid19 Death : फ्रंटलाईन वर्कर्सच्या कुटुंबीयांना 808 कोटींची नुकसानभरपाई, जाणून घ्या तुमच्या राज्यासाठी किती रक्कम
Compensation on Covid19 Death : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची काळजी घेताना अनेक फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांना सरकारने 50 लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम दिली आहे.
Compensation on Covid19 Death : जगासह भारतातही कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनामुळे अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले, अनेक निष्पाप चिमुकल्यांच्या डोक्यावरून आईवडीलांची सावली हिरावून गेली. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी मदत निधी देण्याची घोषणा केली होती. अनेक फ्रंटलाईन कामगारांचा कोरोना रूग्णांच्या उपचार आणि काळजी दरम्यान मृत्यू झाला. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि इतर अनेक फ्रंटलाईन कामगारांचा समावेश आहे. आता केंद्र सरकारकडून 616 पीडित कुटुंबांना 808 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
कोणत्या राज्यात किती नुकसान भरपाई देण्यात आली?
केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा काढला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आत्तापर्यंत कोणत्या राज्यांमध्ये किती नुकसान भरपाईची रक्कम दिली गेली ते जाणून घ्या.
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे. येथे 202 फ्रंटलाइन मृतांच्या कुटुंबीयांना 100.5 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
दिल्ली : दिल्लीतही कोरोना संसर्गाने कहर केला आहे. आतापर्यंत येथील 56 आघाडीच्या पीडितांच्या कुटुंबीयांना 28 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
बिहार : बिहारमध्ये 93 पीडित कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. अशाप्रकारे सरकारकडून 46.5 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये 74 फ्रंटलाइन मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. आतापर्यंत येथे 37 कोटी नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली आहे.
पंजाब : पंजाबमधील आघाडीच्या 29 मृतांना 14.5 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
राजस्थान : राजस्थान राज्यातील १३६ पीडित कुटुंबांना ६८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश : यूपीमध्ये 134 फ्रंटलाइन मृतांच्या नातेवाईकांना 67 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
हरियाणा : हरियाणातील 29 कुटुंबांना 14.5 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या काळात आघाडीवर असलेले कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची काळजी घेतली आहे. सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट थांबताना दिसत आहे. दररोज केसेसमध्ये घट होत आहे. पण या कोरोनाच्या काळात आघाडीचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सेवेबद्दल आणि समर्पणाबद्दल संपूर्ण देश त्यांचे आभार मानत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात देशात 71 हजार 365 कोरोना रुग्णांची नोंद, 1217 जणांचा मृत्यू
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- Hijab Controversy : आक्रमक जमावाला सामोरं जाणारी 'ती' युवती कोण? काय आहे कर्नाटक हिजाब प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha