एक्स्प्लोर

CNG Price : सोलापुरात सीएनजी 95 रुपये प्रतिकिलो, कुठे किती आहे दर? जाणून घ्या...

CNG Price Hike : गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र गेल्या महिनाभरात सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या किमती वाढल्या असून, त्यामुळे इंधन दरात वाढ होताना दिसत आहे.

CNG Price Hike : महागाईने (Inflation) जनतेचे हाल सुरु आहे. देशातील महागाईचा भडका कायम आहे. गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र गेल्या महिनाभरात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) तसेच एलपीजी (LPG) गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या सीएनजीचा दर 76 प्रति किलो आहे. महानगर गॅस लिमिटेडने 29 एप्रिल रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या (CNG) किमतीत 4 रुपये प्रति किलोने वाढ केली होती. यानंतर मुंबईत सीएनजीचा दर 76 रुपये किलोवर गेला. याआधी 12 एप्रिल रोजीही महाराष्ट्रात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. आणि त्याआधी 6 एप्रिल रोजी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली होती.

सोलापूरमध्ये सीएनजी दर जास्त
सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ़ झालीय. सोलापूरमध्ये सीएनजीचे दर 95 रुपयांवर पोहोचले आहेत. महिन्याभरात जवळपास 12 ते 15 रुपयांनी सीएनजीचे दर वाढल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सुर उमटतोय. मागील काही दिवसांपूर्वी सोलापुरात सीएनजीचा दर 81 रुपये इतका होता. मागील महिन्यात सीएनजीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाली होती. 

या आठवड्यात सीएनजीच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोलापुरात सीएनजीचे दर 95.59 रुपये किलोवर पोहोचला आहे. आधी सोलापुरात पुण्याहून इंधन पुरवठा व्हायचा, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने सोलापुरात सीएनजीचे दर वाढले होते. मात्र आता सोलापुरातून डिलर्सना इंधनाचा पुरवठा होऊनही सीएनजीचे दर वाढतानाच दिसत आहेत. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापुरात देवदर्शनासाठी पुण्यामुंबईहून अनेक नागरिक येत असतात. पुण्यामुंबईच्या तुलनेत सोलापुरात सीएनजीचे दर खूप जास्त असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. तसेच सोलापुरात व्यावसायिक गाडी चालकांना देखील या वाढीव दरामुळे मोठा फटका बसतोय.

दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4.25 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या भागात याआधी 14 एप्रिल रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी 7 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली होती. यापूर्वी 6 आणि 4 एप्रिललाही देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रत्येकी 2.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. गुजरात गॅसनेही 6 एप्रिल रोजी सीएनजीचे दर 6.5 रुपये प्रति किलो दराने वाढवले ​​होते. त्यानंतर गुजरातमधील सीएनजीचे दर 76.98 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. 1 एप्रिल रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्ली आणि जवळच्या भागात सीएनजीच्या दरात प्रति किलो 80 पैशांनी वाढ केली होती. यावेळी, पीएनजीच्या किंमतीतही प्रति किलो 5.85 रुपये दराने वाढ झाली आहे.

शहर सीएनजी दर (प्रति किलो)
मुंबई 76.00
दिल्ली 71.61
चेन्नई 73.17
कोलकाता 74.82

येथे पाहा व्हिडीओ : सोलापुरात सीएनजीचे दर 95 रुपये प्रतिकिलोवर

घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांच्या पार

घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरातही आज 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1020 रुपये असणार आहे. आधी ही किंमत प्रति सिलेंडर 970.50 रुपये इतकी होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 03 April 2025Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजीABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
Embed widget