Odisha Flood : ओडिशातील 10 जिल्ह्यात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, साडेचार लाख नागरिकांना फटका
ओडिशात मुसळधार पावसामुळं (Rain) अनेक ठिकाणी पूर आला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Odisha Flood : ओडिशात मुसळधार पावसामुळं (Rain) अनेक ठिकाणी पूर आला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून, साडेचार लाखाहून अधिक नागरिक यामध्ये बाधित झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक (CM Naveen Patnaik) यांनी या पूरस्थिती असलेल्या भागाची हवाई पाहणी केली. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना मदत देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री पटनायक यांनी घेतला आहे.
ओडिशा राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. साडेचार लाखाहून अधिक नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. संबलपूर, बारगढ, सोनपूर, बौद्ध आणि अंगुल जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांतील लोकांनाही सात दिवसांची मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शेतजमिनींसह अनेक घरांचे नुकसान झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच पुरामुळे नुकसान झालेल्या गुरांसाठी मदत आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जनावरांसाठी औषधांची तरतूद जलद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पुराचे पाणी ओसरल्यानंतर 7 दिवसांच्या आत नुकसानीचे मूल्यांकन करून 15 दिवसांत आर्थिक मदत देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री पटनायक यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. दरम्यान, ओडिशातील पुरामुळं राज्यातील 10 जिल्ह्यांतील 1 हजार 757 गावांमधील 4.67 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत बाधित झाले आहेत. ज्यामध्ये 60 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.
ओडिशात आलेल्या भीषण पुरामुळं जनजीवन विस्कलीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर 21 ऑगस्ट 2022 रोजी होणारी असिस्टंट सेक्शन ऑफिसरची (ASO) लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशा लोकसेवा आयोग लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Kolhapur Rain : पंचगंगा नदीचा पूर झपाट्याने ओसरला, राधानगरी धरणाच्या केवळ एकाच दरवाजातून विसर्ग सुरु
- Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, कुडाळमधील निर्मला नदीला पूर, 27 गावांचा संपर्क तुटला