Gujarat News: गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभात शहरात रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये जातीय संघर्ष झाला. त्यानंतर दगडफेक करणाऱ्या आणि दुकाने आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.


या घटनेबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरातील छापरिया भागात दुपारी रामनवमीची मिरवणूक निघाली, तेव्हा दोन समुदायांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली.


या संदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, "पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याशिवाय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहराबाहेरून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाच्या (Control Room) एका अधिकाऱ्याने सांगितले की, आनंद जिल्ह्यातील खंभातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी झाली, ज्यामध्ये दोन गटांकडून दगडफेक झाली. ज्यात दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले. दोन गटाच्या या गदारोळात लावण्यात आलेल्या आगीत एक दुचाकी आणि जीपचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha