MPPEB Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) म्हणेजच एमपी व्यापम गट 3 ने उप अभियंता आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते MPPEB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3435 रिक्त जागांवर बंपर भरती करण्यात येणार आहे.


मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ भर्ती 2022 अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 एप्रिल 2022 पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 एप्रिल 2022 आहे.


अर्ज कसा करायचा?
MPPEB पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट peb.mp.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3435 पदांवर भरती करण्यात येणार आहेत.


शैक्षणिक पात्रता
MPPEB च्या भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना पाहाली.


वयोमर्यादा आणि अर्ज फी
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावी. सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज फी 560 रुपये आहे तर आरक्षित श्रेणीसाठी फी 310 रुपये आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha