Coronavirus Cases Today in India : देशात एका दिवसात कोरोनाचे 1 हजार 54 नवीन रुग्ण आढळले असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 35 हजार 271 इतकी झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबळींची संख्या 5 लाख 21 हजार 685 झाली आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 132 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 233 ने कमी झाली आहे. देशातील रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.76 टक्के इतका आहे.


दैनिक कोरोना संसर्ग दर 0.25 टक्के
आकडेवारीनुसार, दैनंदिन संसर्ग दर 0.25 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.23 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 2 हजार 454 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 185 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.


रुग्णांची संख्या चार कोटींच्या पुढे
7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख होती. नंतर 23 ऑगस्ट 2020 रोजी रुग्णांची संख्या 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 19 डिसेंबर 2020 रोजी देशातील कोरोना रुग्णांनी एक कोटींचा आकडा पार केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha