एक्स्प्लोर

मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे सरन्यायाधीश होण्याची शक्यता, एस ए बोबडे यांचा अल्पपरिचय

न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे. त्यामुळे आता मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. खुद्द रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारला नवे सरन्यायाधीश म्हणून एस ए बोबडे यांचं नाव सुचवलं आहे. न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता. याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते. न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अल्पपरिचय - न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला. - नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी घेतली. - 1978 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये सामील झाले. - यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायद्याची प्रॅक्टिस केली, तर 1998 मध्ये वरिष्ठ वकील बनले. - 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले. - 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. - 18 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीशांच्या शिफारशींना केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु होईल. कोणत्या मोठ्या निकालांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे यांचा समावेश? * सुप्रीम कोर्टाने आधार कार्डसंदर्भात दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती एस. एस. बोबडे यांचाही समावेश होता. आधार कार्डशिवाय कोणताही भारतीय नागरिक सुविधांपासून वंचित राहू शकत नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं होतं. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती नागप्पन यांचा समावेश होता. * सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं, त्याचा तपास सुप्रीम कोर्टाचेच तीन न्यायमूर्ती करत होते. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, एन व्ही रमण आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश होता. * नोव्हेंबर, 2016 मध्ये तीन मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या निकालात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेही सामील होते. त्याच्यासोबत या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश टीएस ठाकूर, न्यायमूर्ती एके सीकरी हे देखील होते. * मागील चाळीस दिवसांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाती दररोज सुनवाणी करणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पीठात एस ए बोबडेही सहभागी होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नजीर यांचा समावेश होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय येणं अद्याप बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain News: इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Embed widget