एक्स्प्लोर

CJI Gawai: परमात्म्याने जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दु:ख नाही; सरन्यायाधीश बी.आर. गवईंना बूट दाखवणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य

Chief Justice of India Gawai Hurled shoe: सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने सोमवारी सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप.

Chief Justice of India Gawai Hurled shoe: भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राकेश किशोर (Rakesh Kishor) याने बूट फेकल्यानंतरही सरन्यायाधीश गवई (CJI B R Gawai) यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला माफ केले होते. मात्र, यानंतरही राकेश किशोर याचा मुजोरपणा कायम आहे. त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही, असे राकेश किशोर याने म्हटले. (Hurled shoe on CJI)

16 सप्टेंबरला एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवई साहेबांनी त्या दाव्याची थट्टा उडवली. त्यांनी म्हटले की, तुम्ही मूर्तीला प्रार्थना करा, मूर्तीलाच सांगा, स्वत:ची पुर्नबांधणी करा. जेव्हा न्यायालयात दुसऱ्या धर्माबाबतच्या याचिका येतात तेव्हा मोठे निर्णय घेतले जातात. पण जेव्हा सनातन धर्माबाबतची याचिका न्यायालयात येते तेव्हा न्यायालय त्याबाबत काहीतरी नकारात्मक निर्णय देते. मी हिंसेच्या विरोधात आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाही. मीदेखील खूप शिक्षण घेतलेले आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेतही नव्हतो. मात्र, माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केले, याचा विचार करा. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे, असे राकेस किशोर याने म्हटले. 

सरन्यायाधीश गवई यांनी काही दिवसांपूर्वी खजुराहो येथील विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीची याचिका फेटाळून लावली होती. कारण ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकारक्षेत्रात येते. 'तुम्ही  इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थन करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असा दावा करत आहात की, तुम्ही विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा', असे सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावर सरन्यायाधीश गवई यांनी मी सर्व धर्मांचा आदर करत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, यावरुन राकेश किशोर प्रचंड नाराज झाला होता.

राकेश किशोर याने सोमवारी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याजवळ एक कागद सापडला होता. त्यावर लिहले होते की, 'माझा संदेश हा प्रत्येक सनातन्यासाठी आहे. हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'. या प्रकारानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर याच्यावर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद रद्द केली होती. विशेष गोष्ट म्हणजे राकेश किशोर याने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही सरन्यायाधीश बी.आर. गवई हे शांत राहिले होते. त्यांनी म्हटले होते की, 'हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मीदेखील विचलित झालेलो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही'. यानंतर सरन्यायाधीशांनी सुनावणी सुरुच ठेवली होती.

आणखी वाचा

थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हल्ल्याचा प्रयत्न; सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

पंतप्रधानांचा सरन्यायाधीश गवईंना फोन; बूट फेकण्याच्या कृतीवर म्हणाले, प्रत्येक भारतीय नाराज

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Embed widget