एक्स्प्लोर
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन चिमुरड्यांसह एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी सेनेने एका आठवड्यात 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
श्रीनगर : वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारतात पाठवून एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शांततेची भाषा करत असले तरी पाकिस्तानी सैन्याकडून मात्र वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. रात्री पाकिस्तानी रेंजर्सकडून केलेल्या गोळीबारात पूंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर आहेत.
VIDEO | कुपवाडात सुरक्षा दल-अतिरेक्यांमध्ये चकमक | एबीपी माझा
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारचे गोळे आणि बंदुकांच्या साहाय्याने सामान्य नागरिकांवर फायरिंग केली. पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या गोळीबारात रूबाना कौसर (24),त्यांच्या मुलगा फजान (5) आणि नऊ महिन्याची मुलगी शबनम हिचा मृत्यू झाला. या हल्ल्यात रुबानाचा पती मोहम्मद युनूस गंभीर जखमी झाला आहे. या घटनेच्या काही वेळ आधीच पूंछच्या मनकोट परिसरात केलेल्या गोळीबारात नसीमा अखतर नावाची महिला जखमी झाली.
सलोतरी आणि मनकोट याशिवाय पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी आणि बालकोट परिसरात देखील गोळीबार केला गेला आहे. भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी सेनेने एका आठवड्यात 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
VIDEO | ...म्हणून हाफिज, मसूद आणि दाऊदची आता खैर नाही | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
पाकिस्तानच्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद
विंग कमांडर अभिनंदन यांचं भारतात आगमन होत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक सुरुच आहे. पाकिस्ताननं काल उरी आणि मेंडर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानच्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यात एका सामान्य नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले.
शहीद झालेल्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) एक निरीक्षक आणि जवान, त्याचबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुपवाडातील बाबगुंद परिसरातीस एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी लपून बसलेल्या घराच्या दिशेने सुरक्षा कर्मचारी जात असताना झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले.
VIDEO | तब्बल 60 तासांनी भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement