मुंबई : सध्या संपूर्ण देशभरात नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) स्वागताची तयारी सुरु आहे. पण दुसरीकडे मागील काही वर्षांपासून धास्ती असलेल्या कोरोना (Covid 19) देखील त्याचं डोकं वर काढतोय. सध्या देशात JN1 व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच या JN1 व्हेरियंटचे 19 रुग्ण एकट्या गोव्यात (Goa) आहेत. त्यामुळे नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला पसंती देण्याऱ्या अनेकांच्या चितेंत भर पडली असल्याचं पाहायला मिळतंय. 


गोव्यामध्ये नाताळ आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी अनेक फेस्टिवल होत असतात. पण पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या सनबर्न फेस्टिवल हा 28 ते 30 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. या फेस्टिवलसाठी जगभरातले पर्यटक गोव्यात येत असतात. पण आता याच फेस्टविलवर कोविडचं सावट निर्माण झालंय. 


गोव्यात रुग्णांची संख्या चिंताजनक


गोव्यात सध्या कोरोनाची रुग्णांची संख्या ही दिवासगणिक वाढत चाललीये. सध्या आलेल्या JN1 व्हेरियंटचे 19 रुग्ण गोव्यात सापडले आहेत. पण तरीही यामुळे राज्याच्या पर्यटनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे पर्यटनावर जरी कोणत्याही प्रकारचं सावट निर्माण होणार नसलं तरीही यामुळे संक्रमणाची भीती देखील आहे. 


केंद्राच्या सूचनेचे पालन होणार


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देखील राज्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तसेच आरोग्य मंत्र्यांनी योग्य प्रकारची खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती देखील दिलीये. 


नागरिकांनी घाबरू नका, काळजी घ्या


राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका, मात्र काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना


केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : 


Coronavirus Update : कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली! मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क