चीनच्या कुरापती सुरुच; नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य समोर
दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीत आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. एलएसी अर्थात लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर चीनच्या (PLA) सैन्यानं तळ ठोकले आहेत.
![चीनच्या कुरापती सुरुच; नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य समोर chinese army PLA tents seen on Indian lac new images Pangong tso ladakh चीनच्या कुरापती सुरुच; नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य समोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/05184837/china.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लडाख : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती उदभवलेली असतानाच आता आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आली आहे. या वृत्तामुळं दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीत आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. एलएसी अर्थात लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर चीनच्या (PLA) सैन्यानं तळ ठोकले आहेत.
चीननं नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य नुकतीच समोर आली आहेत. ज्यामध्ये पँगाँग त्सो लेकच्या दक्षिणेला कैलास पर्वतरांगांच्या तळाशी कर खोऱ्यात चीनचं तळ नजरेस पडत आहे. हाती आलेल्या छायातित्रांमध्ये हे स्पष्ट होत आहे की, चुशूलमध्ये नेमका भारत आणि चीनच्या सैन्यांच संघर्ष का सुरु आहे.
29-30 ऑगस्टला रात्री प्री- अॅम्पटीव्ह ऑपरेशनअंतर्गत भारतीय सैन्यानं चीनला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावेळी या भागातील सॅटेलाईट छायाचित्रंच हाती आली होती. पण, आता मूळ स्वरुपातील छायाचित्र समोर आल्यामुळं तेथील चित्र स्पष्ट होत आहे. या छायाचित्रामध्ये पँगाँग त्सो लेकही स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामुळं हेच सिद्ध होत आहे, की भारतीय भूखंडावर पुन्हा एकदा चीनची घुसखोरी आणि नियंत्रण रेषा भागातील कुरापती सुरुच आहेत.
मे 2020 पासून सुरु आहे संघर्ष....
चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये मागील वर्षापासून म्हणजेच 2020 मधील मे महिन्यापासून संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास इथं दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव पाहायला मिळाला. याच धर्तीवर देशाचं सार्वभौमत्त्व अबाधित राखण्यासाठी आणि संरक्षणाच्या कारणासाठी अनेक चीनी बनावटीच्या अॅप्सवर भारतात बंदीही घालण्यात आली. शिवाय अनेक चीनी कंपन्यांशी असणारे करारही रद्द करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)