हॉस्टेलमधील 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळणारा शिक्षक अटकेत, बदला घेण्यासाठी केलं कृत्य
Sukma News : छत्तीसगडच्या सुकमा (Sukma) जिल्ह्यात वादातून एका शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल (Phenyl) मिसळले. त्याला न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Chhattisgarh Sukma News : छत्तीसगडच्या सुकमा (Sukma) जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पाकेला पोर्टा केबिन निवासी विद्यालयात (Hostel School) तब्बल 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल (Phenyl) मिसळल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षक धनंजय साहूला अटक केली असून कोर्टाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) सुनावली आहे.
जुन्या वादातून कृत्य
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी शिक्षक धनंजय साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात गेल्या एका वर्षापासून वाद सुरु होता. याआधी साहू अधीक्षक पदावर होता, मात्र एका विद्यार्थ्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्याला त्या पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर दुजल पटेल यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. याच रागातून साहूने बदला घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या जेवणात विष मिसळल्याचे पोलिस तपासात समोर आले.
कारवाई आणि निलंबन
ही घटना उघड झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली. कलेक्टर देवेश कुमार ध्रुव यांनी आरोपी शिक्षक धनंजय साहूला निलंबित केले. तसेच अधीक्षक दुजल पटेल यांनाही पदावरून हटवून समग्र शिक्षण विभागात (Samagra Shiksha) हलवले. सहाय्यक अधीक्षक गौतम कुमार ध्रुव यांनाही हटवून माध्यमिक शाळेत (Secondary School) पाठवण्यात आले. त्यांच्या जागी भवनसिंग मंडावी यांची नवी अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
न्यायालयीन कारवाई
सुकमा जिल्ह्याचे एसपी रोहित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना फिनाईल मिसळून देणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
हा प्रकार केवळ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा नसून, शिक्षण संस्थेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. अशा गंभीर प्रकारामुळे पालक आणि समाजामध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
ही बातमी वाचा :























