एक्स्प्लोर

Chhattisgarh Naxal Attack: हल्ल्यात 28 हून अधिक नक्षलवादी ठार, सीआरपीएफच्या डीजींचा दावा

Chhattisgarh Naxal Attack: शहीद जवानांमध्ये बिजापूरचे 8 डीआरजी जवान, छत्तीसगडचे 6 एसटीएफ जवान, 7 कोबरा जवान आणि 1 बस्तरिया बटालियन आहेत.

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्याबाबत सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंग यांनी मोठा दावा केला आहे. कुलदीप सिंग म्हणाले आहेत की या हल्ल्यात 28 पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या या मोठ्या हल्ल्यात 22 सैनिक शहीद झाले. कुलदीप सिंग यांनी सांगितले की अद्याप बेपत्ता जवान सापडलेला नाही.

28 नक्षलवादींचा खात्मा : कुलदीप सिंग
कुलदीप सिंग म्हणाले, "तुमच्याकडेही या संदर्भात माहिती आली असेल की नक्षलवाद्यांच्या 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे खरे आहे की ते ठार झालेल्या लोकांची संख्या स्वीकारत नाहीत. मात्र, ही संख्या नक्कीच 28 पेक्षा जास्त असेल आणि जखमींची संख्या त्यापेक्षा जास्त असेल."

कुलदीप सिंग म्हणाले, जवान जेव्हा जंगलातून शोधमोहीम राबवून परत येत होते तेव्हा नक्षलवाद्यांनी टेकलागुडामजवळ अचानक हल्ला चढवत सैनिकांवर गोळीबार सुरू केला. आमच्या सैन्याने रणनीतीनुसार लढाई सुरू केली. यात बरेच लोक जखमी झाले. "

बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची खात्री नाही : कुलदीप सिंग 
कुलदीपसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शहीद जवानांमध्ये बिजापूरचे 8 डीआरजी जवान, छत्तीसगडचे 6 एसटीएफ जवान, 7 कोबरा जवान आणि 1 बस्तरिया बटालियन यांचा समावेश आहे. एक दवान अद्याप बेपत्ता आहे. तो नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची बातमी आहे, पण अद्याप याची खातरजमा झालेली नाही."

नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट
छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचं स्पष्ट झालंय. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.

ही घटना घडायच्या आधी हिडमा टेकुलगुडा आणि जुनागुडा गावाच्या जवळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर त्या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून हिडमाला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, बीजपुर पोलिसांचे डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान बीजपुर आणि सुकमा जिल्ह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget