Chhattisgarh CRPF Firing : आपल्याच जवानांवर गोळीबार, CRPF च्या चार जवानांचा मृत्यू
Sukma CRPF Firing : सुकमा येथे सीआरपीएफ जवानानं आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झालाय.
CRPF Jawan Firing : छत्तीसगढ़मधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सुकमा येथे एका सीआरपीएफ जवानानं आपल्याच साथीदारांवर अचानक गोळीबार (CRPF Firing) केला. या घटनेमध्ये चार जवानांचा मृत्यू झालाय. तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. बस्तरचे आयजीपी सुंदरराज यांनी या वृत्ताला एबीपीसोबत बोलताना दुजोरा दिलाय. एएनआय या वृत्तसंसथेनं दिलेल्या माहितीनुसार, सुकमा येथील मराईहगुडा स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लिंगमपल्ली सीआरपीएफ कँपमध्ये झालेल्या गोळीबारात सीआरपीएपच्या 50 बटालीयनच्या (CRPF 50 Bn ) चार जवानांचा मृत्यू झालाय. तर तीन जवान जखमी आहेत.
सीआरपीएपच्या 50 बटालीयनचा एक जवान रात्रपाळीच्या ड्युटीवर तैणात होता. त्या जवानानं अचानक मध्यरात्री कॅम्पवर गोळीबार (CRPF Firing) केला. या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चार जवानाचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखणी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जवानाने आपल्याच कॅम्पवर गोळीबार का केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफकडून (CRPF Firing) या घटनेचा तपास केला जात आहे.
Chhattisgarh: Four jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp in Maraiguda Police station limits of Sukma. A jawan had opened fire at the camp. pic.twitter.com/4ZF64RCNKM
— ANI (@ANI) November 8, 2021
बस्तरचे आयजीपी सुंदरराज यांनी सांगितलं की, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाद झाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानाने आपल्या एके-47 रायफलने अन्य साथीदारावर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा जागीच मृत्यू झालाय. तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच, अन्य जवान आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. आरोपी जवानाला पकडण्यात आलं आहे. पोलिस आणि सीआरपीएप आरोपी जवानाची चौकशी करत आहेत.