सुकमा हल्ल्याचा बदला, CRPF कडून 20 नक्षलवाद्यांचा खात्मा
![सुकमा हल्ल्याचा बदला, CRPF कडून 20 नक्षलवाद्यांचा खात्मा Chhattisgarh Crpf Hits Back After Sukma Attack 20 Naxals Killed Latest News Update सुकमा हल्ल्याचा बदला, CRPF कडून 20 नक्षलवाद्यांचा खात्मा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/17144322/Bjijapur_CRPF_Encounter_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सुकमा : सीआरपीएफ जवानांनी छत्तीसगडच्या सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. बिजापूर जिल्ह्यातील धडक कारवाईत सीआरपीएफच्या जवानांनी 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
24 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवान नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याची संधी शोधत होते.दरम्यान, या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ या कारवाईचाच असल्याचा दुजोरा सीआरपीएफने दिला आहे. मात्र नक्षलवाद्यांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची ओळखही पटलेली नाही.
बिजापूर जिल्ह्यातील रायगुडम परिसरात कोब्रा पोलिस आणि जिल्हा पोलिसांच संयुक्त पथक गस्तीसाठी जंगलात गेलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही नक्षल्यांच्या गोळीबारा चोख प्रत्युत्तर दिलं.
या चकमकीत 15 ते 20 नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक देवेंद्र चौहान यांनी केला आहे. गोळीबार करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या सुमारे 100 ते 150 दरम्यान होती, असंही देवेंद्र चौहान यांनी सांगितलं.संबंधित बातम्या
सुकमा हल्ला घडवणाऱ्या दहा संशयित नक्षलवाद्यांना अटक
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोंची गाडी उडवली, 1 शहीद सुकमा हल्ला: गुप्तचर यंत्रणेची मोठी चूक? 5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण? छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीदमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)