मोबाईल सिम बदलण्यासंदर्भात नियमांत बदल; 'या' नागरिकांना सिम खरेदी करता येणार नाही
नवीन सिम खरेदी करण्यासाठी आता कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाही आणि कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला 1 रुपये पेमेंट करावं लागेल.

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी मोबाईलचे नवीन सिम घेण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन मोबाईल सिम घेण्यास प्रीपेड किंवा पोस्टपेडसाठी मॅन्युअली फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. आता ग्राहक डिजिटल फॉर्म भरून प्रीपेड किंवा पोस्टपेड नंबरसाठी सहजपणे सिम मिळवू शकतात.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या निर्णयाला मान्यता दिली आहे. अलीकडेच दूरसंचार विभागाने KYC चे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा सिमची आवश्यकता असेल, तर कनेक्शनसाठी KYC पूर्णपणे डिजिटल असेल. म्हणजेच आता कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाही आणि कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला 1 रुपये पेमेंट करावं लागेल. ग्राहक हे काम वेबसाईट किंवा अॅपद्वारे करू शकतात.
केवायसी प्रक्रिया अशी पूर्ण करा
- सिम प्रोव्हायडचे अॅप डाउनलोड करा आणि आपल्या फोनवर नोंदणी करा.
- तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाचाही नंबर द्या ज्यावर तुम्ही OTP पाहू शकता.
- OTP च्या मदतीने लॉगिन करा.
- त्यानंतर सेल्फ KYC चा पर्याय निवडा आणि माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.
18 वर्षाखालील कुणालाही सिम मिळणार नाही
दूरसंचार विभागाच्या मते, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला दूरसंचार ऑपरेटर सिम कार्ड जारी करू शकत नाहीत. तसेच जर व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसेल तर सिमकार्ड उपलब्ध होणार नाही. आता नवीन सिम घेण्यापूर्वी कस्टमर अॅक्युझिशन फॉर्म (CAF) भरावा लागेल. हा ग्राहक आणि कंपनी यांच्यातील करार आहे, ज्यात अटी-शर्ती आहेत.
काय आहे नवीन नियम?
- भारतीय करार कायदा 1872 नुसार कोणताही करार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये असावा.
- भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त 12 सिम घेऊ शकते.
- मोबाईल कॉलिंगसाठी 9 सिम वापरता येतात.
- या 9 सिमचा वापर फक्त मशीन-टू-मशीन कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो.
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha





















