श्रीहरीकोटा : भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि नवी इतिहास रचला गेला. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून (Vikram Lander) प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरला. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) 14 दिवस चंद्रावरील विविध माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, विक्रम लँडर (Vikram Lander Module) चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ लँडरच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. इस्रोने हा खास व्हिडीओ ट्वीट करत शेअर केला आहे.


रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडीओ


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रोव्हर चंद्रावर (Pragyan Lunar Rover) उतरतानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, 'चांद्रयान-3 चा रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला.' त्यानंतर काही वेळाने इस्रोनं दुसरं ट्वीट केलं आहे. 


पाहा व्हिडीओ : लँडरमधून रोव्हर नेमका बाहेर कसा पडला?






सौर पॅनेलची कशाप्रकारे जलद तैनात झाले?


यानंतर आणखी एक व्हिडीओ शेअर करत इस्रोने लिहिलं आहे की, 'टू-सेगमेंट रॅम्पमुळे रोव्हरचे रोल-डाउन सुलभरित्या झालं. सोलर पॅनलने ऊर्जा निर्माण केल्यामुळे रोव्हरचं काम सुलभ झालं आहे. रोव्हरच्या रोलडाउनच्या आधी, उतार आणि सौर पॅनेल कशाप्रकारे जलदरित्या तैनात झाले, ते या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. Ch-3 मिशनमध्ये एकूण 26 तैनाती यंत्रणा UR राव उपग्रह केंद्र (URSC) बेंगळुरू येथी इस्रोच्या केंद्रामध्ये विकसित करण्यात आल्या आहेत.'






Chandrayaan-4 : चांद्रयान-3 नंतर आता चांद्रयान-4


चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO-Indian Space Research Organisation) एवढ्यावरच थांबलेली नाही. इस्रो (ISRO) आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. इस्रोची आगामी चांद्रयान-4 मोहिम भारत आणि जपान यांची संयुक्त मोहिम असेल.


Aditya L1 : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूर्यमोहिम


इस्रोची (ISRO) आदित्य L1 (Mission Aditya) ही मोहिम 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा (Shriharikotta) येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल-1 अंतराळयानाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चांद्रयान मोहीम यशानंतर आता सूर्यावर जाण्याची इस्रोची तयारी आहे. या मोहिमेद्वारे 24 तास सूर्यावर देखरेख ठेवली जाणार आहे.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Aditya L-1 Mission : चंद्रानंतर आता 'सूर्या'चा ध्यास... 24 तास सूर्यावर नजर, आदित्य-L1 मोहिमेचा नेमका खर्च किती? 'आदित्य' हे नाव कसं पडलं