मुंबई : भारताची चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिम फत्ते झाली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताने (India) चांद्रयान-4  (Chandrayaan 4) मोहिमेसाठी जपान (Japan) सोबत हातमिळवणी केली आहे. इस्रोची आगामी चंद्रमोहिम भारत आणि जपान यांची संयुक्त मोहिम असेल. चांद्रयान-3 च्या यशानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-4 मोहिमेकडे लागल्या आहेत.


चांद्रयान-3 नंतर आता चांद्रयान-4


चांद्रयान-4 (Chandrayaan-4) हे चांद्रयान-3 चा (Chandrayaan-3 on Moon) पुढील टप्पा असेल. चांद्रयान-4 मोहिम भारत (India) आणि जपान (Japan) यांच्यातील संयुक्त अंतराळ मोहिम असणार आहे. चांद्रयान-4 मोहिमेचं नाव लुपेक्स मोहिम असं ठेवण्यात आलं आहे. ही मोहिम चांद्रयान-4 या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान-3 ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-4 मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्यात येतील.


भारताची जपानशी हातमिळवणी


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO-Indian Space Research Organisation) आणि जपान अंतराळ संशोधन संस्था (JAXA-Japan Aerospace Exploration Agency) यांच्याकडून आगामी लुपेक्स (Lupex) मोहिम हाती घेण्यात आली आहे. लुपेक्स मोहिमेला (Lupex Mission) भारताच्या चंद्रमोहिमेचा पुढील टप्पा म्हणजेच चांद्रयान-4 मोहिम असंही म्हटलं जात आहे. चांद्रयान-4 मोहिमेचा उद्देश चंद्राचा सखोल शोध असणार आहे.


चांद्रयान-4 मोहिमेचा उद्देश काय?


चांद्रयान-4 मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांतील संशोधनामुळे चंद्रावर पाणी असल्याचं संकेत मिळाले आहेत. चंद्रावरील पाण्याचे साठे, तेथील पाण्याची नेमकी उपलब्धता याचा अभ्यास केला जाईल. मानवाच्या अस्तित्वासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचा शोध मानव आणि भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी फार महत्त्वाचा ठरेल.


भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर


भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चांद्रयान-3 चंद्रावरील माहिती गोळा करून इस्रोला पाठवेल, ज्याचा फायदा आता चांद्रयान-4 मोहिमेसाठी होणार आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरला, त्यानंतर त्यातील प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. आता पुढील 14 दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील माहिती इस्रोला पाठवणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aditya L-1 Mission : चंद्रानंतर आता 'सूर्या'चा ध्यास... 24 तास सूर्यावर नजर, आदित्य-L1 मोहिमेचा नेमका खर्च किती? 'आदित्य' हे नाव कसं पडलं?