Chandrayaan-3 Mission : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून ISRO प्रमुखांसह इतर शास्त्रज्ञांचा सन्मान
ISRO च्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ISRO चे चेअरमन एस. सोमनाथ आणि इस्रोचे इतर वैज्ञानिक आणि अधिकार्यांचा सत्कार केला. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धरामय्या यांनी इस्रो प्रमुखांना मानाची पगडी आणि शाल देऊन सत्कार केला.(PC:PTI)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि अंतराळ संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.(PC:PTI)
imagसिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील इस्रो केंद्र, पेनिया येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.(PC:PTI)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.(PC:PTI)
चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यशस्वी लँडिंगनंतर प्रतिक्रिया दिली. हे सर्वांचं यश आहे असं, त्यांनी म्हटलं.(PC:PTI)
इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास रचला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं जगभरात कौतुक केलं जात आहे.(PC:PTI)
इस्रोच्या यशामुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे.(PC:PTI)
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता.(PC:PTI)
इस्रोच्या शास्त्रज्ञांची गेल्या चार वर्षांची मेहनत सफल ठरली आणि भारताने इतिहास रचला.(PC:PTI)