एक्स्प्लोर

Chandrayaan-3 : इस्रोची चंद्रमोहिम अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, अन्यथा... ; जाणून घ्या सविस्तर...

ISRO Moon Mission : जर चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यास अयशस्वी ठरले तर, इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम अयशस्वी ठरेल, त्यामुळे पुढील काही तास या मोहिमेसाठी फार महत्त्वाचे आहेत.

ISRO Chandrayaan-3 : भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. चांद्रयान-3 चा चंद्राकडे प्रवास सुरु आहे. चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं असून त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान-3 ने सर्व कक्षा ठरलेल्या वेळेत पूर्ण केल्या असून आता ते चंद्राच्या कक्षेत लवकरत प्रवेश करेल. दरम्यान, चांद्रयान-3 साठी पुढील काही तास फार महत्त्वाचे आहेत. 

...तर चांद्रयान-3 मोहिम होईल अयशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने म्हटले आहे की, चांद्रयान-3 मोहीम या आठवड्याच्या सुरुवातीला पृथ्वी सोडल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश करेल. दरम्यान, या मोहिमेचं यश सध्या एका गंभीर टप्प्यावर अवलंबून आहे. जर चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकलं नाही तर, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरेल. त्यामुळे सध्या चांद्रयान-3 मोहिम गंभीर टप्प्यावर आहे. चांद्रायान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर ही मोहिम सफल होणार आहे. 

चांद्रयान-3 मोहिम महत्त्वाच्या टप्प्यावर

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अंतराळ यानाचा वेग कमी होतो, ज्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राला चंद्राच्या स्थिर कक्षेत खेचता येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये शिरण्यास चांद्रयान-3 अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चांद्रयान-3 चंद्रावर कोसळू शकते किंवा त्यापासून दूर फेकले जाऊ शकते. त्यामुळे चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं फार महत्त्वाचं आहे.

चांद्रयान -3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

इस्त्रोने सांगितल्याप्रमाणे, चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत चंद्राच्या दिशेने प्रवास सरु केला आहे. तसेच जर यामधील सर्व प्रक्रिया या ठरलेल्या वेळेत अपेक्षे प्रमाणे पार पडल्या तर चांद्रयान-3 5 ऑगस्ट 2023 पर्यंत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं अपेक्षित आहे. इस्रोने 31 जुलै 2023 रोजी ट्वीट करत चांद्रयानाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीटमध्ये की, चांद्रयान -3 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी  निर्धारित वेळेत त्याचे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. 

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार?

चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताची चंद्रावर उतरण्याची योजना आहे. चांद्रयान-3 यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश ठरेल. चंद्राचा दक्षिण ध्रुव अधिक काळ अंधारात असतो. या भागात पाण्याची साठे शोधण्याचाही या मोहिमेमागचा एक हेतू आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण झालं. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chandrayaan-3 : ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले चांद्रयान-3 चे अवशेष? रहस्यमयी वस्तूचं गूढ काय?

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Embed widget