एक्स्प्लोर

भारतात येत्या डिसेंबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची लस, सीरम इन्स्टिट्यूटचा अंदाज

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी काही गोष्टींना मान्यता मिळाली तर या डिसेंबरपर्यंत भारतात कोरोनाची लस यायला काही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूट भारत सरकारकडे इमर्जन्सी ट्रायलसाठी विनंती करु शकते.

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक वृत्त आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतातील कोरोनाची लस कधी येणार याची माहिती दिली आहे. अदर पूनावाला यांच्या मते या वर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबरपर्यंत भारतात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासोबत त्यांनी हेही स्पष्ट केले की या लसीवर सुरु ब्रिटनमध्ये सुरु असलेली चाचणी आणि डीसीजीआयची मान्यता यावर ही लस कधी तयार होईल हे अवलंबून असेल.

अदर पूनावाला यांनी सांगितले की ब्रिटनमध्ये ही कोरोना लस अॅडवान्स ट्रायलच्या स्टेजमध्ये आहे. जर त्या देशाने मान्यता दिली तर भारतीय आरोग्य मंत्रालयाकडे याच्या इमर्जन्सी ट्रायलसाठी विनंती करता येऊ शकेल. त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली तर ही चाचणी भारतातही केली जाऊ शकते. आणि असे जर झाले तर येत्या डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस तयार होण्यास काही अडचण नाही.

वृत्तवाहिन्यांशी चर्चा करताना अदर पूनावाला यांनी सांगितले की ऑक्सफोर्ड कंपनी कोरोना व्हायरसच्या 10 कोटी लसीच्या उत्पादनाची पहिली बॅच तयार करत आहे. ती 2021 सालच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी हेही सांगितले की ऑक्सफर्डची लस ही किफायतशीर असेल. पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्डची लस विकसित करत आहे.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डच्या लसीव्यतिरिक्त आणखी काही लसींच्या संशोधनावर काम करत आहे. तसेच सिरम इन्स्टिट्यूट स्वत:ची लसही विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त कोरोनाच्या लसींच्या संशोधनाचे काम सुरु आहे. त्यापैकी 38 लसी या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. जगभर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लसीच्या संशोधनाला वेग आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

BCG लसीचा वापर वयोवृद्धांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी, ICMR चे नवे संशोधन

Corona Vaccine | कोरोनावरील स्वदेशी लस 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता, भारत बायोटेकचा दावा

नॉर्वे सरकारची मोठी घोषणा, देशातील नागरिकांना देणार मोफत कोरोनाची लस

Coronavirus Vaccine | आनंदाची बातमी... वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस तयार होण्याची शक्यता : WHO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Embed widget