एक्स्प्लोर
आता सर्व जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पासपोर्ट सेवेसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार आहे.
यासाठी देशभरातील 800 जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी याबाबतची माहिती दिली.
व्ही के सिंह म्हणाले, "यंदा 150 पोस्ट ऑफिस कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षा सर्व 800 जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येतील.
7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
गाव-खेड्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी मोठ्या शहरांत चकरा मारणं जिकिरीचं जातं. त्यामुळेच केंद्र सरकारने अशा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं व्ही के सिंह म्हणाले. परराष्ट्र मंत्रालय आणि पोस्ट विभागाने संयुक्तपणे हे पाऊल उचललं आहे. पासपोर्ट बनल्यानंतर तो घरपोच पोहोचवण्याचं काम पोस्ट ऑफिस करणार आहे. संबंधित बातम्या : 7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? 7 दिवसात पासपोर्ट बनवण्यासाठी सोप्या टिप्स पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल, प्रक्रिया अधिक सोपी! आता येणार ई-पासपोर्ट, पासपोर्टमध्ये आता इलेक्ट्रॉनिक चीप! तक्रार निवारणासाठी परराष्ट्र खात्याची ‘ट्विटर सेवा’ लाँच जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत कोण कितव्या स्थानी? 7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? आता जिल्ह्यातल्या पोस्ट ऑफिसमध्येच पासपोर्ट मिळणार! कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement