एक्स्प्लोर
Advertisement
पीएफच्या निर्णयाला केंद्राची स्थगिती, निर्णयाविरोधात कामगार संघटनांची जाळपोळ
नवी दिल्ली: वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम काढण्यास मनाई करण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी काल ही माहिती दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारनं प्रॉव्हिडंट फंड काढण्यास मनाई करणारा निर्णय जाहीर केला होता. त्याविरोधात देशभरातील नोकरदारांमधून संतापाची लाट उसळली. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत या निर्णयाला सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याला मुदतवाढ देत आता 1 ऑगस्टनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पीएफबाबात हा नियम लागू करण्यात येणार होता:
नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे. आता मात्र अशा कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम मिळू शकेल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नाही. हा नवीन नियमही 1 मे पासून लागू होणार होता.
पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्याबाबत कामगार मंत्रालयाने मात्र काही नियम शिथील केले होते. पीएफ खातेधारक घरखरेदी, वैद्यकीय उपचार, विवाह किंवा मुलांचं शिक्षण सारख्या काही कारणांसाठी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकतात.
खातेधारक स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी, मुलांच्या मेडिकल, डेंटल किंवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या आणि मुलांच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
Advertisement